November 12, 2025

शिवरायानंतर प्रथमच एकत्र येऊन मराठ्यांनी घडविला इतिहास – इतिहासात झाली नोंद.

सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ 

छत्रपती शिवाजी महाराजानंतर प्रथमच मराठा समाज एकत्र  येऊन शांततेने घडविला इतिहास..!

विशेषज्ञांच्या अभ्यासानुसार जेव्हा-जेव्हा मराठा समाज एकत्र आला तेव्हा तेव्हा इतिहास घडविलेला आहे. कुठलीही  शरीरयष्टी व राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला साधारण मराठी माणूस “मनोज जरांगे पाटील”  या साधारण व्यतीमत्वाने जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावे असे कार्य करून विश्वविक्रम घडवून आणलेला आहे. मराठा समाज सर्व स्तरामध्ये पांगलेला असतांनाही त्याला एकत्र आणणे व शांततेने मोर्चे काढून विरत जाहीर सभेपर्यंत कार्यक्रम घेणे हे अश्यक्य अशी गोष्ट आहे.