दिनांक : २५ ऑक्टोबर २०२३
गदाना : शासनला मराठा आरक्षणासाठी दिलेली २४ तारखेची डेडलाईन संपल्यानंतर आता मराठा समाज जागोजागी सर्कल नुसार उपोषणाची तयारी करतांना दिसत आहे. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणासाठी खुलताबाद तालुक्यातील काटशेवरीफाटा येथे मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण खुलताबाद तालुक्यातील काटशेवरीफाटा येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु झाले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येऊन ठेपलेला दिसत असतांनाच अश्यातच गावागावाध्ये गावबंदी चे बोर्ड गावांच्या दर्शनीय भागामध्ये दिसत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते व पक्ष आघाड्यांनी पाठींबा दिलेला दिसत आहे.
खुलताबाद तालुक्यातील “बेमुदत सकाळी उपोषण” साठी चे डिजिटल बोर्ड सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिरतांना दिसत आहे, मराठा समाज तसेच इतर समाज बांधव समर्थन देण्यासाठी येतांना दिसत आहे.
या उपोषण स्थळी मराठा बांधवांची गर्दी होतांना दिसत आहे.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!