December 6, 2025

न्यू हायस्कूल गदाना येथे अबळाजी वाहुळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी : – अशोक अधाने

www.themaharastratoday.com

गदाना (ता. खुलताबाद) – दिनांक ५ जुलै २०२५, शनिवार रोजी न्यू हायस्कूल गदाना येथे अबळाजी वाहुळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. पूर्णाताई अधाने होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक जे. पी. शेजवळ साहेब, प्रा. एम. ए. वाहुळ (निवृत्त प्राचार्य, मिलिंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), प्रा. सौ. प्रतिभाताई अहिरे (साहित्यिक, शिवाजी महाविद्यालय, कन्नड), श्री. भास्कर वाहुळ, व मुख्याध्यापक श्री. पवार सर यांची उपस्थिती लाभली होती.

गुणवंत विद्यार्थी कु. भक्ती कचरू वाघ व चि. सुमित अशोक वाहुळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. खंडागळे सर यांनी केले. श्री. देशमुख सर यांनी मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन श्री. धनवे सर यांनी केले.

या प्रसंगी पालक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पवार सर व शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.