June 24, 2026

पुढार्यांना गावात प्रवेश बंदी; विशेष ग्रामसभेत ठराव पास; मराठा आरक्षण वाद पेटला; गदाना ग्रामस्त आक्रमक

मंगळवार दिनांक : १७ ऑक्टोबर २०२३

मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे गदाना ग्रामस्थाच्या वतीने विशेष ग्रामसभा घेऊन ठराव पारित करण्यात आला.

यावेळी सर्व जातीधर्माचे प्रतिनिधी व ग्रामस्थांनी ठरविलेल्या आरक्षण मुद्यावर विचार विनिमय करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या निर्णयावर ठाम राहिले त्यांचेच अनुकरण करत गदाना ग्रामपंचायतच्या वतीने विशेष ग्रामसभा घेत ठराव पास करून मराठा समाजाला जोपर्यत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये पुढार्यांना प्रवेश बंदी करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

यानंतर ग्रामस्थांनी तहसील कार्यालय खुलताबाद व पोलीस स्टेशन खुलताबाद येथे सदरील निवेदन सादर केले.

You may have missed