www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मो. 9623871987

पक्षी ‘पाकोळी’ पक्षास निसर्गमित्राने दिले जीवनदान असंख्य पक्षांना दिले जीवनदान; सेवेतून मिळतो आनंद – देविदास थोरात
संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणा भोवला? तामिळनाडूत तीन IPS अधिकारी निलंबित
‘सावंगी ते मिटमिटा १२ किमी ग्रीनफिल्ड रिंग रोड’ प्रकल्प पुन्हा मार्गी लागावा, यासाठी विभागीय आयुक्त साहेबांना सविस्तर निवेदन
फुलंब्री मतदार संघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत फुलंब्री तालुक्यासाठी ३७४ कि.मी. पाणंद रस्त्यांना मंजुरी
“गाव नकाशातील रस्ता मोकळा करा” — लामणगाव येथील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मो. 9623871987
खुलताबाद (दि. 05 एप्रिल 2026) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त खुलताबाद येथे उत्सव समितीची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक श्री. कारभारी दादा ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस पंचायत समिती सदस्य श्री. दिनेश भाऊ अंभोरे व श्री. महेंद्र घुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली तसेच नवीन उत्सव समितीची निवड करण्यात आली.
नवीन समिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली –
अध्यक्षपदी श्री. नितीन जाधव यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी श्री. शशिकांत घुसाळे यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. विकास घाटे, श्री. अमोल ढवळे, श्री. स्वप्नील लोखंडे आणि श्री. शुभम जाधव यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला साईनाथ केदारे, अनिल घुसळे, आनंद घुसळे, विरेंद्र वाघ, किशोर जाधव, माजी सरपंच द्वारकादास घोडके, धनाजी नागे, राजेश निकाळजे, रामदास निंभोरे, राहुल बनकर, ईश्वर देवकर, किरण गायकवाड, राजन घुसळे, सौरव केदारे, प्रवीण घुसाळे, राज ढवळे, रोहित वाघमारे, करण देवकर, चिरायु ढवळे, राज जाधव, सचिन निकाळजे, छबू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

More Stories
पक्षी ‘पाकोळी’ पक्षास निसर्गमित्राने दिले जीवनदान असंख्य पक्षांना दिले जीवनदान; सेवेतून मिळतो आनंद – देविदास थोरात
संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणा भोवला? तामिळनाडूत तीन IPS अधिकारी निलंबित
‘सावंगी ते मिटमिटा १२ किमी ग्रीनफिल्ड रिंग रोड’ प्रकल्प पुन्हा मार्गी लागावा, यासाठी विभागीय आयुक्त साहेबांना सविस्तर निवेदन