July 26, 2026

सिद्धार्थ व सानिका महाविद्यालयाचा ‘स्नेहसंमेलन 2026 : जल्लोष युवा मनाचा’ उत्साहात संपन्न

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

दिनांक : 21 मार्च 2026

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : अशोक अधाने

छत्रपती संभाजीनगर  – रमाई प्रतिष्ठान संचलित सिद्धार्थ महाविद्यालय व सानिका महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “स्नेहसंमेलन 2026 : जल्लोष युवा मनाचा” हे भव्य सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरचे महापौर सन्माननीय समीरजी राजूरकर तसेच जालना जिल्ह्याच्या महापौर सन्माननीय सौ. वंदना मगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रमाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. चारुलता मगरे व प्रा. सुनील मगरे हेही प्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे होते.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महापौर समीरजी राजूरकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तर सौ. वंदना मगरे यांनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दर्जेदार कार्यक्रमाबद्दल संस्थेचे आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी महाविद्यालयाची यशोगाथा मांडत संस्थेच्या जडणघडणीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकल नृत्य, गाणी तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीचेही विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक बागुल साहेब, शिवाजीराव पाटील, सोमदे पाटील यांची उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे सचिव साहिल मगरे व सौरव मगरे हेही यावेळी उपस्थित होते.

You may have missed