दि.09.02.2024
क्षमता व आवडीनुसार करिअरची निवड करा-आमदार सतीश चव्हाण
खुलताबाद – प्रत्येकाची आवड-निवड वेगवेगळी असते. मात्र विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या अभिव्यक्तीस आकार यावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. आज (दि.9) तालुक्यातील गोळेगाव, घोडेगाव, खिर्डी येथील विविध शाळेतील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून त्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
खिर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, दोन्ही तालुक्यातील जवळपास 75 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभागी होऊन कल्पकतेने रंगाचा वापर करत अप्रतिम चित्र रेखाटले. आम्हाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर आम्ही काय करू शकतो हे विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिले. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आयुष्यात रंग भरण्याची कला अवगत होईल. विद्यार्थ्यांना कोणाला अभ्यास तर कुणाला खेळायला, तर कोणाला चित्र काढायला, संगीत ऐकायला आवडते. कुणाला डॉक्टर, इंजिनिअर होण्याची इच्छा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे तर पालकांनी पाल्यांना आवडीच्या क्षेत्रात ध्येय निश्चित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी पालकांना केले.
याप्रसंगी मजूर फेडरेशनचे संचालक महेश उबाळे, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, गजानन फुलारे, विनोद जाधव, ज्ञानेश्वर दुधारे, मिठू महालकर, साईनाथ जाधव, ज्ञानेश्वर मातकर, दादासाहेब जाधव, दिनेश सावजी, अजीम मणियार, बबन औटे, सखाराम गोल्हार, दिलीप औटे, मुख्याध्यापक व्ही.पी.गाडेकर, ए.डी.खैरनार, पी.एस.धुमाळ, आर.आर.माळी, अनुपमा मोतीयळे, मंगला पाटील आदींची उपस्थिती होती…
फोटो कॅप्शन- खिर्डी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पारितोषिक वितरण करतांना आमदार सतीश चव्हाण.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन