आज दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी गोळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या उपसरपंच संतोष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये चित्रकला,नृत्य, गायन,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, विविध कलाकृती गुणांचे कार्यक्रम घेण्यात आले.
प्रथमता: छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सरपंच ताराबाई कारभारी औटे यांचे पुत्र श्री. विष्णू कारभारी औटे व सौ. कांचन विष्णू आवटे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये विविध गावातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, गदाणा, गोळेगाव, सद्गुरू जनेश्वर विद्यालय घोडेगाव, विद्यालंकार प्री प्रायमरी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बोरवाडी, रेणुका नगर वस्ती शाळा, इरा इंटरनॅशनल स्कूल काटशेरी फाटा या व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश औटे यांनी केले तर या कार्यक्रमास उपस्थिती असलेले सरपंच,उपसरपंच, सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील,ग्रामसेवक तथा शालेय शिक्षक वृंद व पालक वर्ग यांची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ 8 मार्च 2024 रोजी होणार आहे.
More Stories
वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक घट
खुलताबादात जगदंबा पंचमी उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता ➡️ विविध देवी-देवतांच्या सोंगांनी वेधले भाविकांचे लक्ष; मंगलदेवी पंचमी उत्सवाची शहरभर परंपरा कायम
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत वेरूळ येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!