April 23, 2026

काटशेवरी फाटा येथे साखळी उपोषणाला विनोद पाटील यांची भेट

दिनांक : २७ ऑक्टोबर २०२३

गदाना : काटशेवरी फाटा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला बसलेले विविध गावातील मराठा बांधवांनी सहभाग नोंदविला त्यांच्या साखळी उपोषणाला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भेट घेऊन सदरील ठिकाणी बसलेल्या नागरिकांशी चर्चा केली.

त्यावेळी विनोद पाटील म्हणाले कि, मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी लढावे परंतु सध्या मराठा तरुण आत्महत्या करतोय या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला अन्न व पाणी त्याग करून सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांनी आरक्षणाची पुढील रणनीती काय असेल याबाबत चर्चा केली.