June 13, 2026

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण

दि.१८ सप्टेंबर २०२३

www.themaharashtratoay.com

दि.17/09/2023 रोजी राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय घोडेगाव, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव ता. खुलताबाद जि.औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांची प्रभातफेरी घोडेगावात निघाली.
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. साईनाथ पाटील जाधव साहेब, मुख्य अतिथी म्हणून डाॅ श्री.अनिल औंधकर साहेब (Senior Engineer & Business Manager JSW COMPANY,)
शिवसेना तालुका उपप्रमुख श्री.प्रकाश पा. जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष तथा उपसरपंच श्री दादासाहेब पा. जाधव, पोलीस पाटील घोडेगाव श्री. कारभारी पा.जाधव, ग्रामसेवक श्री. सोनवणे साहेब,ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री द्वारकादास पा. जाधव, श्री.आप्पासाहेब जाधव हे उपस्थित होते .
सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय येथे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.दादासाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. तर वरीष्ठ महाविद्यालय येथे श्री.अनिल औंधकर साहेब यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. महाविद्यालयामध्ये आज सर्वांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रतिज्ञा/शपथ घेतली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.साईनाथ पाटील जाधव साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर प्रमुख पाहुणे श्री.अनिल औंधकर साहेबांचे भाषण झाले.त्यांनी विद्यार्थ्यांना खुप सुंदर असे मार्गदर्शन केले . Communication skill, Personality Development, याबद्दल सांगितले.
विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त खुप सुंदर गीत म्हटले.व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृतमहोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. होते. यास्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.रांगोळी स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे श्री.अनिल औंधकर साहेब यांनी 2000/- बक्षिस दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.ठाकूर मॅडम यांनी केले. तर आभार श्री.कासार सरांनी मानले.

यावेळी मोठ्या संख्येने गावकरी , महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यास , प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

You may have missed