March 12, 2026

शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा योजनेचा लाभ द्या; आम आदमी पार्टीची खुलताबाद तहसील येथे निवेदन

 

“नुकसान भरपाई ची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना द्या
आम आदमी पार्टीची मागणी”

खुलताबाद तालुक्याला कोणी वाली नाही”
– आम आदमी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे

खुलताबाद ता.२४ बातमी

सन 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर पिके नष्ट झाली होती. त्यासाठी शासनस्तरावर पंचनामे करून निधीही उपलब्ध असून देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही,
कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करावे, विविध लाभार्थी यादी तलाठी सजा कार्यालय येथे लावण्यात यावी, सलग २६ दिवस पावसाचा खंड पडल्याने खुलताबाद तालुक्यातील सर्व मंडळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा योजनेचा लाभ द्यावा आणि डमडम तलाव बुडीत क्षेत्र बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करून मोबदला द्यावा या मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्ष श्री सतीश देवेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय खुलताबाद येथे गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम शेख, शहर सचिव सतीश दुनघव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सय्यद सल्लाहुद्दिन, तालुका युवा अध्यक्ष किशोर जाधव, सुरेश नवघरे, अमोल भालेराव आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.

https://youtu.be/MpXrDxg0Vzc

(चौकट:- “खुलताबाद तालुक्याला कोणी वाली नाही”
– सतीश देवेंद्र लोखंडे, युवा जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी)
खुलताबाद तालुक्याला कोणी वाली नाही येथील राजकीय नेतृत्व कायम सावत्र वागणूक देत असल्याने शेतकरी, कष्टकरी, तरुण, बेरोजगार, उद्योग धंदे सर्वच ठप्प झाले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे यांनी आमदार प्रशांत बंब यांचे नाव न घेता केले. सतीश लोखंडे पुढे म्हणाले की खुलताबाद तालुक्यातील जलसंधारणाचे ऑफिस गंगापूरला हलवले, त्या मागोमाग कृषी उत्पन्न बाजार समिती लासुर बाजार समितीत विलीनीकरण केली. तदनंतर विविध शासकीय योजना निधी सर्वांचा वापर केवळ गंगापूर तालुक्यातच केला आणि आता शेतकऱ्यांना 25% विमा मिळण्यापासून देखील खुलताबाद तालुक्यातील सर्व महसूल मंडळ वळगण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रबळ राजकीय नेतृत्व अभावी याकडे कोणी लक्ष देत नसल्याने खुलताबाद तालुक्याला कोणी वाली नाही असा गंभीर आरोप सतीश देवेंद्र लोखंडे यांनी केला.)

यावेळी शेतकरी त्रिंबक गुमलाडू, बाळू भावसार, अमोल गुमलाडू, अय्युब पटेल, रंगनाथ गायकवाड,संतोष डेडवाल, माणिक जंजाळे,छाया खंडागळे, नेहरू गुमलाडू, चंपालाल जंघाळे, गुलाब पटेल, कुरेशी यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या उपस्थिती होती.