April 23, 2026

लेखन्या विझल्या की विझवल्या की पेनातली संपली शाई सारस्वतांची वाचा बसली हल्ली कुणीच का बोलत नाही?

 

 

!!सारस्वतांनो!!

लेखन्या विझल्या की विझवल्या
की पेनातली संपली शाई
सारस्वतांची वाचा बसली
हल्ली कुणीच का बोलत नाही?

डोळ्यांना झाला काच बिंदू
की वास्तव कोठे दिसेना ?
पिंपळाच्या पारावरती
पुन्हा बुद्ध का हसेना?

आज भयाची पाचर बारीक ?
घट्ट फसून का बसली?
कंठात असूनही सरस्वती
ती कशामुळे रूसली ?

फेकून देऊ जळमटे ही
उधळून देऊं परंपरा
मानवता हाच धर्म खरा
माणुसकीचा वाहू द्या झरा

हिटलर लुई झार असू दे
आम्हा हवी शिवबाची छाती
निर्दालण करण्या खलांचे
मनामनात चेतवू वाती

शब्दांचे हत्यार परजुनी
विवेकाचे झाड लाऊ
चला सारस्वतांनो !!
भविष्याचे उज्ज्वल स्वप्न पाहू

डॉ. ललित अधाने
छ. संभाजीनगर
मो. 9422742865

लेखक – कवी – प्राध्यापक – डॉ. ललित अधाने