प्रतिनिधी : अशोक अधाने
मो.9623871987
www.themaharashtratoday.com
झरी (ता. खुलताबाद) -दि. २९ मार्च: गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या सुसंवाद दौऱ्यानिमित्त झरी येथे त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले. या वेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत स्थानिक समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
ग्रामविकास व प्रशासनाच्या अनियमिततेवर ताशेरे
चौथ्यांदा आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मागील १५ वर्षांत विविध विकासकामे केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भविष्यातही ही विकासगंगा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. गावातील शाळा व शिक्षकांबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि वायरमन गावात वास्तव्यास असतात का? याची त्यांनी गावकऱ्यांकडून विचारणा केली असता, कोणीही गावात राहत नसल्याचे स्पष्ट झाले. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि उपस्थित शिक्षकांना आठ दिवसांत गावात राहण्याचा अल्टिमेटम दिला. तसेच ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी गावात उपस्थित राहावे, असा सक्त आदेश दिला.
तलाठी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चौकशी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या नळपट्टी, घरपट्टी, जलजीवन मिशन आणि घरकुल योजनांबाबत त्यांनी सखोल आढावा घेतला. ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभार ठेवावा आणि ग्रामस्थांनी कर वेळेवर भरावा जेणेकरून गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
गायरान जमीन व घरकुल योजनांबाबत स्पष्टता
गायरान जमिनीवर घरकुल बांधण्याच्या मुद्द्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली की, ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, त्यांनी त्याच ठिकाणी घरकुल बांधावे. ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांच्यासाठी नियोजित लेआउट तयार झाल्यानंतर घरकुल मंजूर करण्यात येईल.
विद्यार्थिनींसाठी बससेवेचा मार्ग सुकर
गावातील विद्यार्थिनींना बाजार सांगवी येथील शाळेत जाण्यासाठी बस वेळेवर उपलब्ध नाही अशी तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली. त्यावर आमदार बंब यांनी तातडीने कन्नड डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधून बसच्या वेळापत्रकात सुधारणा करून मार्ग बदलण्याचे निर्देश दिले. हा त्वरित निर्णय झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
भाजप सदस्य नोंदणी मोहीम आणि मान्यवरांची उपस्थिती
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार बंब यांनी केले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, सरचिटणीस प्रकाश वाकळे मा सभापती दिनेश अंभोरे चेअरमन किशोर नलावडे सरपंच संदीप निकम,योगेश बारगळ, गोपाल वर्मा,विकास कापसे स्वामींनाथ आबा, सरपंच करणसिंग राजपूत विजय चंदवाडे भगवानसिंग चंदवाडे गणेश झुरावत ग्रामसेवक सचिन बनसोडे संदीप राऊत शिवाजी गायकवाड काकासाहेब गायकवाड जिवंत ताटू, सचिन चंदवाडे,गणेश चंदवाडे, सुदामसिंग चंदवाडे, रामू काका, राजू चंदवाडे, व गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन