www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 12 जानेवारी 2026
पडेगाव (मिटमिटा), ता. — छत्रपती संभाजीनगर :
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सिद्धार्थ महाविद्यालय व सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग, पडेगाव (मिटमिटा) येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव केला. राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच धाडसी, कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेल्या होत्या. त्या युद्धकला, तलवारबाजी व घोडेस्वारीत पारंगत होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज पेरून आत्मविश्वास निर्माण केला. महाराष्ट्र घडवण्यासाठी जसा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवला, त्याचप्रमाणे राष्ट्रनिर्मितीसाठी स्वामी विवेकानंद यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचा,
“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका,”
हा संदेश आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असून युवकांनी तो आपल्या जीवनात आत्मसात करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिलवंत गोपनारायण, सानिका कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य रेणुका चव्हाण, मोईन तडवी, श्रीकांत पातोडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
More Stories
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्याची मतमोजणी प्रक्रिया व तयारी बाबत.
📰 ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश