February 9, 2026

समाजसेवक सुमित पंडित यांची १००% मतदानासाठी धडपड

माणुसकी सलुन मध्ये मतदान केलेल्या दात्यांची मोफत दाढी कटिंग व महिलांचा सन्मान करण्यात आला

मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावे व मतदानाची १००% आकडेवारी वाढावी याकरिता सुमित पंडित ची धडपड

मतदानाचा टक्का वाढावा याकरीता सुमित पंडित गेल्या १५ दिवसांपासून चार्ली चाप्लीन च्या वेशभुषा करुन मतदान १००% व्हावे या करिता जनजागृती करित आहे आता शेवटच्या मतदानाच्या दिवशी त्याने आनोखी शक्कल लढवली होती. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं याकरिता त्याने आपल्या माणुसकी सलुन जटवाडा रोड येथे मतदात्यांची दाढी कटिंग मोफत व महिलांचा शाल श्रीफळ प्रशस्तिपत्र देवुन समाजसेविका पुजा पंडित यांनी सन्मानित केले. सुमित शासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृतीचे कार्य अनेक वर्षापासून करीत आहे त्याने या आधी सुद्धा मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी मुलगी झाली कि पीत्यांची दाढी कटिग मोफत वृक्ष लागवड करणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत, टॉयलेट भांडणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत, सैनिकांची चादिच्या वस्ताऱ्याने मोफत सलुन सेवा अश्या विविध योजना सुमित राबवतो विशेष म्हणजे त्याच्या माणुसकी सलून मध्ये वाचनालय देखील आहे तरी संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त मतदात्यांनी मतदान करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सुमित पंडित यांनी नागरिकांना केले होते.नागरिकांनी या योजनेचे कौतुक करीत ह्या योजनेचा लाभ घेतला माणुसकी सलुन मध्ये सकाळी ७ वाजल्यापासुन सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करुन आल्यावर दाढि कटिंग मोफत करुन देण्यात आली व मतदान केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.