www.themaharastratoday.com
दिनांक: 31 जुलै 2025
प्रतिनिधी : अशोक अधाने
यावर्षी खरीप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे नव्यानेच लागू करण्यात आलेली ॲग्री स्टॅक (Agri Stack) पोर्टलवर शेतकरी कार्ड नोंदणीची अनिवार्यता.
शासनाने शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक पोर्टलवर स्वतःची “शेतकरी” म्हणून ओळख नोंदविणे बंधनकारक केले आहे. हेच कार्ड महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल व पिक विमा वेबसाईटशी लिंक असल्यामुळे पिक विमा भरताना ते कार्ड अनिवार्य आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड नोंदवलेले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
तलाठी व महसूल विभागामार्फत गावपातळीवर तसेच तहसील कार्यालयामार्फत योजनेबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात आले. कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यकांनीही शेतकऱ्यांना शेतकरी कार्ड तयार करण्याचे आवाहन केले. तरीही पर्याप्त जनजागृती अभावामुळे बहुतांश शेतकरी ॲग्री स्टॅकवर नोंदणी करू शकले नाहीत.
जून व जुलै महिन्यात खरीप हंगामासाठी पिक विमा भरायची प्रक्रिया सुरू झाली असताना, अनेक शेतकऱ्यांचे कार्ड Approval झाले नव्हते. शासनाने नंतर जलदगतीने प्रक्रिया सुरू केली, परंतु आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नसणे, आधार अपडेट नसणे, दस्तऐवज अपूर्ण असणे या कारणांमुळे त्रुटींचा डोंगर उभा राहिला.
सध्याच्या अंतिम टप्प्यात अनेक शेतकऱ्यांनी नोंदणीचा प्रयत्न केला तरीही ॲग्री स्टॅक पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, विशेषतः सर्व्हर डाऊन समस्या, यामुळे शेतकरी कार्ड नोंद होऊ शकले नाही व पिक विमा भरता येणार नाही ना..? यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, “शासन मुदतवाढ देणार का?” हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.
गावोगावी व ऑनलाईन केंद्रांवर शेतकरी कार्ड व पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढताना दिसत आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी होत आहे.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!