November 16, 2025

विद्यालंकार प्रायमरी स्कूलमध्ये “बाल आनंदनगरी” कार्यक्रम उत्साहात साजरा

दिनांक: 28 डिसेंबर 2024
वार्ताहर: अशोक अधाने
गदाना, तालुका: खुलताबाद, जिल्हा: छत्रपती संभाजीनगर

विद्यालंकार प्रायमरी स्कूलमध्ये “बाल आनंदनगरी” कार्यक्रम उत्साहात साजरा

दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी विद्यालंकार प्रायमरी स्कूल, बोरवाडी येथे “बाल आनंदनगरी” हा रंगतदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. मधुकर जाधव यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून रंजना वाकळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. कीर्ती जोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आनंददायी प्रदर्शन मांडले. यामध्ये डोसा, पाणीपुरी, चना फ्राय, भजे, डोनट, कचोरी, आलू वडा, साबुदाणा वडा, राजगिरा पट्टी, गुलाब जामून, शेंगदाण्याचे लाडू, पापड, भेळ, पावभाजी, बालुशाही, समोसे, आणि इतर स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता.

कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित प्रमुख पालकांमध्ये सचिन पवार, सुरेश श्रीखंडे, नंदकिशोर राऊत, गजानन आढाव, साईनाथ वाकळे, संदीप वाकळे, अजय होळकर, कडुबा होळकर, किशोर जाधव, आणि प्रवीण जाधव यांचा समावेश होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये विशाल गवळे, समीर पटेल, आरती रानडे, सुनिता राऊत, कविता लोहार, प्रीती हरणे, आणि रवींद्र किसन गोल्हार यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

“बाल आनंदनगरी” हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन व शिक्षणाचे उत्तम साधन ठरला. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.