दि. ३० ऑगस्ट २०२३
The maharashtra Today
आज जि प प्रा शा लामणगाव येथे भाऊ-बहीनीच्या पवित्र नात्याचा “रक्षाबंधन” हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सर्व विद्यार्थीनिनी “सोनियांच्या ताटी उजळल्या ज्योती ,ओवाळते भाऊराया-वेड्या बहिणीची ही वेडी माया”म्हणत आपले वर्गबंधूंना राखी बांधून व औक्षण करून बंधुप्रेम राहू दे अशी आर्त भावना व्यक्त केली
या नंतर आज बाजार डे असल्यामुळे खाऊ म्हणून केळी चे वाटप करण्यात आले,आज हा आगळा वेगळा कार्यक्रम बघून मुले ही खुश झाली ,या प्रसंगी किशोर मालोदे, गोरखतात्या मालोदे, गणेश मालोदे, भारत मालोदे, रामू मालोदे,अंगणवाडी च्या नंदाताई मालोदे, सविता मालोदे,मुख्याध्यापक बी डी जाधव,दत्ता खाडे, विजय भंडारी,मनोज साळुंके, शेख मुस्तफा,संतोष बोबडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस