June 12, 2025

राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय व राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय व सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 65वा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 65वा विद्यापीठ वर्धापन दिन.

आज दिनांक 23/08/2023 रोजी राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय व राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय व सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 65वा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण.
करण्यात आले. विद्यापीठ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माननीय साईनाथ पाटील जाधव साहेब हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. व्यंकटेश लांब सर (इंद्रराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड) हे होते.


प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. व्यंकटेश लांब सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा.साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष साहेबांचे स्वागत प्राचार्य डॉ. घुगे सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
श्री. लांब सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ठाकूर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांने झाली.
मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संदिप जाधव सर,प्राचार्य डी.डी. घुगे सर,शाळेचे मुख्याध्यापक खैरनार सर, प्रा.तुकाराम जाधव सर, प्राध्यापिका ठाकूर मॅडम, प्रा.नलावडे सर,प्रा फुलारे सर, प्रा. अमोल जाधव सर, हारदे सर, सोनवणे सर हे उपस्थिती होते.