✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987
www.themaharashtratoday.com
खुलताबाद | दि. १९ मार्च २०२५ | प्रतिनिधी
येसगाव नं. 1 (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे माननीय विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून “पालक मेळावा” आणि “ग्राम दरबार उपक्रम” यांचे आयोजन करण्यात आले. दोन्ही उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालक मेळाव्यात ८३ पालकांचा सहभाग
पालक मेळाव्यास एकूण ८३ पालकांनी सहभाग नोंदवला. पालकांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विविध उपक्रम समजून घेतले. विशेषतः मुलांसोबत कशाप्रकारे संवाद साधावा आणि त्यांचे संगोपन कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
गावातील स्त्री-पुरुष पालकांनी दोरीच्या खेळात सक्रिय सहभाग घेतला. या खेळाद्वारे मेंदूच्या चेतापेशींना चालना देण्याचे महत्त्व तसेच त्यासंबंधी बौद्धिक पार्श्वभूमी समजावून देण्यात आली.
दुपारी १२ ते १ दरम्यान विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. यात बालविवाह प्रतिबंध, ‘लेक लाडकी योजना’ व ‘लाडकी बहिण योजना’ यांसारख्या सामाजिक योजनांची माहिती पालकांना देण्यात आली.
ग्राम दरबार उपक्रम – गावकऱ्यांसोबत संवाद
“एक दिवस गावकऱ्यांसोबत – ग्राम दरबार उपक्रम” अंतर्गत गटविकास अधिकारी श्री. प्रकाश नाईक, विस्तार अधिकारी श्री. कहाटे, सांख्यिकी अधिकारी श्री. शिंदे, आरोग्य अधिकारी श्री. ससाणे, शिक्षण अधिकारी श्री. केवट, अंगणवाडी अधिकारी श्रीमती शिंदे व श्रीमती जोशी, कृषी अधिकारी श्रीमती कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजापुरे, डॉ. बाविस्कर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या उपक्रमात विविध आठ विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी, सरपंच सौ. जिज्ञासा काळे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमातील मान्यवर आणि सहभागी ग्रामस्थ
ग्रामपंचायत सदस्य गीता खंडागळे, सलमान शेख, शंकर खंडागळे, ग्रामसेविका मनीषा मुळे, कर्मचारी योगेश काळे, रामू नाना खंडागळे, राजू जाधव, किसन गोल्हार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी ग्राम दरबार उपक्रमात सहभाग घेतला.
ग्राम दरबारात गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तत्काळ सूचना देण्यात आल्या.
उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यशस्वी आयोजन
पालक मेळावा आणि ग्राम दरबार उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. सरपंच व ग्रामसेवकांनी पाणी, अल्पोपाहार व मंडप व्यवस्था केली.
येसगावमधील अंगणवाडी सेविकांना बालशिक्षणावरील ई-अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमानंतर महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
ग्रामस्थांनी आपले अभिप्राय नोंदवत उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क
छत्रपती संभाजीनगर
— प्रतिनिधी:
अशोक अधाने
मोबाईल: ९६२३८७१९८७
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!