November 12, 2025

बरे झाले देवा कुणबी झालो नसता दंभेची असतो मेलो – तुकोबाराय

बरे झाले देवा कुणबी झालो

नसता दंभेची असतो मेलो

– तुकोबारा

 

कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळाल्यावर स्वतःची जात बदलेल असं ज्यांना वाटतं त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुकाराम बोल्होबा मोरे हे स्वतःला अभिमानाने कुणबी म्हणून घेतात ते जातिवंत श्रीमंत मराठा होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख महात्मा फुले हे कुळवाडीभूषण असा करतात कुळवाडी म्हणजे शेतकरी आणि कुळवाडी भूषण म्हणजेच शेतकऱ्यांचा राजा म्हणून शिवाजी महाराजांचे घराणं देखील मराठा कुणबी आहे….

 

ग्वालेर चे द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचे सध्याचे वारसदार जोतिरादित्य सिंधीया (शिंदे )हे कुर्मी…

म्हणजेच कुणबी आहेत ते स्वतः obc मध्ये आहेत त्यांच्या शेकडो एकरच्या आलिशान महालात सोन्याचे झुंबर आहेत तरी देखील ते स्वतःला अभिमानाने कुणबी म्हणवून घेतात….

 

आमचा बाप आज्जा पंजा पंज्याचा आजा पंजा सगळेच कृषीकर्म करणारे म्हणजेच शेतकरी ( कुणबी ) होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे….

आम्ही कर्माने आणि जातीने कुणबी मराठाच आहोत…

 

आम्हाला कुणबी मराठा म्हणून obc मधून आरक्षण मिळणार असेल तर आनंदच आहे….

 

#मराठा_कुणबी_आरक्षण ⚔️✊????