गदाना
दि. १७ सप्टेंबर २०२३
जिल्हा परिषद प्रशाला ममनापूर येथे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम व इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न
दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा ममनापुर येथे मेरी माटी मीरा देश या उपक्रमा अंतर्गत शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली सदरील कार्यशाळेसाठी राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी व जीजीईओ चे डॉ दीपक गायकवाड डॉ तनिषा दळे डॉ आरती थालें व डॉ तुकाराम कांबळे यावेळेस उपस्थित होते.
या व्हिडिओला क्लिक करा संपूर्ण महती पहा..!

त्याचप्रमाणे डॉ दीपक गायकवाड यांनी शाडू माती पासून गणपती कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तर ग्रीन क्लबचे डॉ तुकाराम कांबळे यांनी इको फ्रेंडली गणपतीचे महत्त्व समजून सांगितलेत.

तसेच मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ आरती थांले ,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाचे महत्त्व समजून सांगितले त्याचबरोबर डॉ तनिषा दळे यांनी हसत खेळत गणित कसे शिकवावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी व शिक्षकास करून दाखवले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तम सावळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हूमेंरा पठान मॅडम यांनी केले कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन श्रीमती अमृता जाधव यानी केले.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन