छावणी पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला ४२ वर्षीय महिलेला आधार
महिलेच्या नातेवाईकांशी पोलीसांनी फोनद्वारे संपर्क साधला असता पतीने सांगितले की मनोरुग्ण आहे. तीचा माझा चार वर्षांपासून काहि संबंध नाही संख्या भावानिहि दिली उडवा उडवीची उत्तरे
घरच्यांचा छळाला कंटाळून उच्चशिक्षित कुटुंबातील ४२ वर्षीय महिला गेल्या ४ वर्षांपासून फिरत आहे बेवारस अवस्थेत
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे सुमित पंडित यांच्या माणुसकी वृद्ध सेवालय येथे केले पुनर्वसनासाठी दाखल
आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की आपला जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर ? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी, अथवा पत्नी,किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या जवळच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे.कारण त्या आजारी आहेत, संभाजीनगर शहरात बाबा पेट्रोल पंप परीसरात गेल्या दोन दिवसापासून बेवारस अवस्थेत फिरत होती पोलीसांना ती फिरताना दिसली असता पोलीसांनी तीची विचारपुस केली परंतु ती काही एक बोलायला तयार नव्हती सदरील महिलेला पोलीसांनी छावणी पो.स्टे. येथे दाखल केले व पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी सदर महिलेस विश्वासात घेत विचारपुस केली असता ती महिला जोरजोरात रडायला लागली साहेब माझी कुठेतरी कायमस्वरूपी राहण्याची सोय करा साहेब घरचे लोक खुप छळ करतात मला पागल म्हणतात हात जोडून विनंती केली व महिलेने तीची आपबिती सांगायला सुरुवात केली. तीच्या कडे सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन होता त्यात तीचा पती नामें केदार पराडकर राहणार जुना मोंढा नांदेड येथे वास्तव्यास आहेत तो देखील उच्च शिक्षित असून सध्या आयटी सेक्टर मध्ये काम करतो आहे.व सदर महिलेचा भाऊ शशांक तेली श्रीरामपूर येथे वास्तव्यास आहे.त्यांना पोलीसांनी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तीच्या पतीने सांगितले की चार वर्षांपासून तीचा माझा काही एक संबंध नाही असे उत्तर दिले.महिलेने पुढे सांगितले की मला नवऱ्याने प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये बळजबरीने वेडी असल्याचे
समजुन तीन महिने ठेवले.व नवरा सासू सासरे देर भावजया जावा मला सारख्या त्रास देतात.तु मेंटल आहे जा कुठेही निघून तुझा आमचा काही एक संबंध नाही , तीने सांगितले की माझे आई वडील मयत आहे. वडील आर्मी मध्ये होते वडिलांचे रिटायरमेंट चे पैसे मला मिळाले होते ते सगळे सासरच्या मंडळींनी घेवून मला घरातुन हाकलून दिले.अशी आपबिती तीने पोलीसांना सांगितली असता तिला पोलीसांनी शासकीय रुग्णालय घाटी येथे प्रथमोपचार करिता दाखल केले.व अश्या बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तीसाठी काम करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांना सदर महिलेच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आपल्या माणुसकी वृध्द सेवांवर धोपटेश्वर फाटा जटवाडा रोड संभाजीनगर येथे दाखल करण्यासाठी सुमित पंडित यांच्याशी संपर्क करून आपल्या आश्रमात दाखल करून घेण्याची विनंती केली त्यास तत्काळ प्रतिसाद देत सुमित यांनी सदर महिलेची कागदोपत्री पुर्तता करुन रात्री उशिरापर्यंत आपले माणुसकी वृध्द सेवालय येथे अन्न वस्त्र निवाऱ्या करिता दाखल करुन घेतले. हक्काचा निवारा मीळाल्याने सदरील महिलेस आनंदाश्रु आले व तिने आभार मानले. माणुसकी समुहाची टिम सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.
या सामाजिक कार्यासाठी पोलीस निरिक्षक राजेंद्र होळकर,उप पोलीस निरिक्षक सुरेश माळी,स्वपान नरळे, उप पोलीस निरीक्षक वसंतराव शेळके,के एम भोज,आर.पवार,शेख जमील,छावणी महिला पोलीस कर्मचारी नंदा काळे व
माणुसकी समुहाचे प्रा.शरद सोनवणे, समाजसेवक सुमित पंडित,पुनम चव्हाण माजी सरपंच, समाजसेविका पुजा पंडित,यांनी मदतकार्य केले.
———————————————————————
पोलीसांना होते वेळोवेळी माणुसकी टिम ची मदत आतापर्यंत कितीतरी बेसहारा महिलांना दिला आधार
माणुसकी समूह सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी आणि सामाजिक कर्तव्य स्वीकारण्यासाठी एक समानार्थी शब्द झालेला आहे. ती भगिनी आजाराने पीडित आहे.
हा तीचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा? हे प्रश्न कायम समाजाला विचारल्या जात आहे,आणि कोणीही कायमस्वरूपी ह्यावर उत्तर द्यायला तयार नाही.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात. पण ज्या सामाजिक संस्था अशा बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी काम करतात त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उद्योजकांनी समाजबांधवांनी समोर येणे अत्यंत गरजेचे ठरते. या मदतीतून आपण या जीवन अधिक सुसह्य करू शकतो. आणि समाजाची खरी मानसिक विकृती नष्ट होईल.
—— राजेंद्र होळकर पोलीस नीरीक्षक छावणी
More Stories
सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨