www.themaharashtratoday.com
वेरूळ : दि. ११ ऑक्टोबर २०२३
आमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने खुलताबाद तालुक्यातील नागरिकांसाठी गुडघे दुखी व कंबर दुखी आजारासंदर्भात वेरुळ येथील विश्वकर्मा मंदिरात 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून आज (दि.11) पहिल्याच दिवशी जवळपास 1000 हुनअधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

चार दिवस सुरू राहणाऱ्या या शिबिरात आज खुलताबाद व वेरुळ सर्कलमधील रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यातील 150 पेक्षा अधिक रुग्णांचे मोफत एक्स रे काढण्यात आले. 12 ऑक्टोबर रोजी गदाना तर 13 ऑक्टोबर रोजी बाजारसावंगी सर्कलमधील रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
आज झालेल्या शिबिरात एमजीएमचे डॉ.नोमान इंगळे, डॉ.वीरेंद्र अंदेला, डॉ.तनिश ओबेरॉय यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबीराच्या समारोप प्रसंगी मुंबई येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.अबी तुरब चुनिया यांनी उपस्थित होणार असून एक्स रे काढलेल्या रुग्णांची ते तपासणी करणार आहेत.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.अनिल चव्हाण, श्री.नितीन बागवे, श्री.ज्ञानेश्वर दुधारे, श्री.गजानन फुलारे, श्री.नईम पटेल, श्री.नानासाहेब चंद्रटीके, श्री.श्रीकांत भालेराव, श्री.सोमीनाथ ठेंगडे, श्री.लालचंद चव्हाण, श्री.सतीश फुलारे, श्री.रावसाहेब फुलारे, श्री.दिनेश सावजी, श्री.रियाज शेख,
श्री.भाऊसाहेब वाकळे, श्री.साहेबराव पांडव आदींची उपस्थिती होती.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!