🖋️ वार्ताहर : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
📍 दिनांक – १३ जुलै २०२५
खुलताबाद – सध्या खरीप हंगामात पेरणी व लागवडीची कामे सुरू असून गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शेतकरी यामध्ये व्यस्त आहेत. मात्र, सध्यस्थितीत बाजारसमित्या, सुलतानपूर खरेदी-विक्री संघ, कृषी सेवा केंद्रे, लघुस्तर स्टोअर्स आदी ठिकाणी युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी वेळेवर खतांची खरेदी करून लागवड पूर्ण करावी यासाठी युरिया खताची सुलभ उपलब्धता अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव बंब यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे गंगापूर व खुलताबाद तालुक्यात युरिया खताचा पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
बाजारात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दलाल, व्यापारी यांचा गैरफायदा शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी भूमिका आमदार बंब यांनी घेतली आहे.
🖋️ वार्ताहर – अशोक अधाने
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!