February 9, 2026

कायगाव – गणेशवाडी येथे सकाळ मित्र-श्री फॅमिली गाईड कार्यक्रम संपन्न

ओळी: कायगाव: गणेशवाडी येथे सकाळ मित्र-श्री फॅमिली गाईड या प्रोजेक्टच्या माध्यमातून गुरु सेवकांना माहिती देतांना
या प्रोजेक्ट चे मास्टर ट्रेनर अनिकेत गोरे ,ऋजुता जोशी,अनंत कुलकर्णी.
(छायाचित्र :जमील पठाण)

कायगाव, ता.11(बातमीदार):
सकाळ वृत्त समूहाच्या माध्यमातून सध्या ग्रामीण भागामध्ये सकाळ मित्र – श्री फॅमिली गाईड या प्रोजेक्टच्या माध्यमातून गुरु सेवकांसाठी गणेशवाडी (ता.गंगापूर) येथे सोमवारी( ता.11)रोजी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी गणेशवाडी येथील उजव्या सोंडीच्या पावन जुळ्या गणपती मूर्तींची मान्यवर मंडळींच्या हस्ते पूजन करण्यात आले.यानंतर प्रमुख पाहुण्यांचे ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी ह.भ. प. अशोक महाराज निरफळ ,हभप दत्तात्रय महाराज इष्टके,गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील निरपळ, समाजसेवक दिलीप निकम,मालती निकम, यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्व फाउंडेशन च्या ऋजुता जोशी यांनी यज्ञ आहुती विषयी माहिती दिली, श्री फॅमिली गाईड या प्रोजेक्ट चे मास्टर ट्रेनर अनिकेत गोरे यांनी संपूर्ण माहिती दिली सोबत अनंत कुलकर्णी यांनी प्रेसेंटेशन केले.

यावेळी ताराचंद पाटील निरपळ, जुने कायगाव येथील श्री रामेश्वर मंदिर चे अध्यक्ष संतोष बिरुटे, माजी अध्यक्ष बाळकृष्ण पाटील गायकवाड, अशोक पाटील कान्हे,नुकतेच नर्मदा परिक्रमा पायपीट करीत पूर्ण करणारे विठ्ठल पाटील जाधव,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप निरपळ, शिवाजी निरपळ,नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी,शेतकरी नेते भाऊसाहेब गवळी,मुकुंद देवकर,अंकुश निरपळ,नंदू जाधव, बाळासाहेब कळसकर,गजानन निरपळ,रावसाहेब इष्टके, कैलास निरपळ, गोपाळ कान्हे,शिवाजी देशमुख, ज्ञानदेव मिसाळ,बंडू डहाळे,सुनील मिसाळ,अमोल कान्हे , बाळासाहेब चित्ते ,काकासाहेब मोहिम ,बंडु नजन ,सुदाम कान्हे ,आदित्य निरपळ, नानासाहेब निरपळ ,निखिल निरपळ , वैभव अशोक निरपळ ,पंकज निरपळ ,आकाश निरपळ, सुरज निरपळ ,रामनाथ कान्हे,विनोदविठ्ठल निरपळ,बबन जऱ्हाड सह सकाळ मित्रांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगापूर ग्रामीणचे समन्वयक अशोक अधाने यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच गोपाल कान्हे यांनी केले.