www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 09 डिसेंबर 2025
खुलताबाद तालुक्यात कर्तव्यदक्ष व आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे आमदार श्री. प्रशांत बंब यांच्या बाबतीत शिक्षक संघटनेच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर असंसदीय भाषा वापरल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. संबंधित कार्यकर्ता चंद्रशेखर भोयर याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. समाजातील आदर्श व लोकप्रिय लोकप्रतिनिधींविरुद्ध अशा पातळीवरील वक्तव्ये असह्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यापुढे अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी प्रशासनाने कठोर खबरदारी घ्यावी, अन्यथा कार्यकर्ते हा विषय स्वतः हाती घेऊन त्यांच्या पद्धतीने जाब विचारतील तसेच तीव्र आंदोलन उभारतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा चालू असून संबंधित पोस्टची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
More Stories
मुख्याध्यापक बी. डी. जाधव यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा
गदाना येथे नृसिंह महाराज पंचमी उत्सवाला उत्साहात सुरुवात
जिल्ह्यात मतदार मॅपिंग ७३.६९% पूर्ण; जनजागृतीला वेग देण्याचे निर्देश