राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांचे (आकरा)११ प्रश्न
१ कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन घेणार का ?उद्यापर्यंत उत्तर द्यावे
२ मुख्यमंत्री दिल्लीला गेले त्यावेळी पंतप्रधान याना आरक्षण बाबत सांगीतल होत का?
३ शिंदे समिती गठीत केली तिला 10 हजार पुरावे सापडले , आता समितीचे काम थांबवून मिळालेल्या पुराव्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणार का?
४ ज्या जाती आरक्षणात घातल्या आहेत, 2023 पर्यंत,कुठंकुठल्या जातील पुरव्याच्या आधारावर आरक्षण दिले ते उद्यापर्यंत जाहीर करावे?
५ कुठल्या कुठल्या जाती पुरावे न देता आरक्षणात घातल्या याचे उत्तर सरकारने उद्यापर्यंत द्यावे.?
६ ज्या जाती व्यवसाय आधारित आरक्षण दिले किंवा दुसऱ्या कुठल्या आधारावर त्यांना आरक्षण दिले ते उद्या सरकारने जाहीर करावे…?
७ ज्या जाती राज्यात आरक्षणात घातल्या त्यांना नेमके कुठले निकष लावून घातल्या ते सरकारने उद्यापर्यंत सांगावे…?
८ ज्या जाती ज्यांचा 10 वर्षांनी सर्वे करायचे होते ते सर्वे प्रत्येक 10 वर्षाला केले का हे सांगावे?
९ ज्या जाती प्रगत झाल्या त्या आरक्षणातून बाहेर काढाव्या असे लिहले आहे का असेल तर सरकारने उत्तर द्यावे..
१० मंडल कमिशन ने 14 टक्के आरक्षण ओबीसीना दिले त्यानंतर चार वर्षात कशाचा आधार घेऊन व कुठला निकष लावून आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिले याचेही निकष सरकारने सांगावे?
११ ज्या जाती आरक्षणात घातल्या त्याच्या उपजाती पोटजाती म्हणून किती अंतर्भाव केला काय पुरावे, निकष दिले हे ही सरकारने उद्या सांगावे?
या प्रश्नांची उत्तरं उद्या पर्यंत सरकारने द्यावीत
उत्तर नाही दिली तर आम्हाला तुम्ही आतापर्यंत सांगितलेलं सगळं खोटं समजू
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस