दि. 30 जून 2024 प्रतिनिधी : अशोक अधाने
प्रो ऍक्टिव्ह अबॅकस इंटरनॅशनल कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये धनश्री अधाने यांनी तृतीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांच्या बरोबर आराध्या अधाने यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय श्रुती खाडे आणि जया बडूगे यांनीही स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल बक्षीस मिळाले आहे. धनश्री अधाने यांनी राज्यातून तृतीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते, ज्यामध्ये विविध देशांतील विद्यार्थी आपली गणितीय आणि मेंदूविकास क्षमतांची कसोटी पाहतात. धनश्री आणि आराध्या यांनी आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या यशाच्या मागे त्यांच्या शिक्षिका अर्चना अधाने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी विद्यार्थ्यांकडून कठोर परिश्रम करून घेतले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी करू शकली. विद्यार्थ्यांच्या टीमचे लीडर शशिकांत सांगवीकर यांचेही मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना आमदार प्रशांत बंब यांच्या माध्यमातून मिळाली. आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये बुद्धी चालना प्रोजेक्ट अंतर्गत गंगापूर व खुलताबाद विधानसभा मतदारसंघांमध्ये अबॅकस क्लास जि. प. शाळेमध्ये शिकवणे सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेण्याची आणि आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली.
या यशामुळे त्यांच्या शाळेत आणि समाजात आनंदाचे वातावरण आहे. विध्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस