March 12, 2026

सिद्धार्थ महाविद्यालयात शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

दिनांक : 18 फेब्रुवारी 2026

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : अशोक अधाने

रामाई प्रतिष्ठान संचालित सिद्धार्थ महाविद्यालय, सानिका कॉलेज ऑफ बी. डिझाईन, सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग व सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजन्मोत्सव २०२६ चा दुसरा दिवस उत्साह, जल्लोषात साजरा करण्यात आला.

दिवसाची सुरुवात सकाळी भव्य शोभायात्रेने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन शौर्याची सजीव झलक सादर केली.

दुपारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, स्वराज्याची संकल्पना व शिवरायांचे नेतृत्वगुण यांसारख्या विषयांवर प्रभावी मांडणी केली. स्पर्धकांच्या ओजस्वी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.

तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नाट्यप्रयोगांमधून विद्यार्थ्यांनी शिवकालीन इतिहास आणि परंपरेचे प्रभावी दर्शन घडविले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. डॉ. मनोहर वानखेडे उपस्थित होते. तसेच संचालक प्रा. सुनील मगरे, सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा विठ्ठल गिरी यांनी केले आणि विजेत्या स्पर्धकांचा गौरव करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.