www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
छत्रपती संभाजी नगर: दिनांक ००५ ऑक्टोबर २०२५
सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालयामध्ये आज प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉ. विजय फुलारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे
प्रकुलगुरू सन्माननीय डॉ. वाल्मीक सरवदे आणि संचालक प्रा. सुनील मगरे व डॉ. चारुलता मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत केले. तसेच विविध मनोरंजनांचे डान्स , पेपर नृत्य, कपल डान्स, रॅम्प वॉक, असे विविध प्रकारचे फनी मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
प्रास्ताविकामध्ये प्रा सुनील मगरे म्हणाले, सिद्धार्थ महाविद्यालयाचे २००८ मध्ये सुरू केलेले छोटेसे रोप फक्त एक अभ्यासक्रम होता आज या महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे आज हे छोटेसे रोपटे मोठे वटवृक्ष होऊन या छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू आहे या महाविद्यालयात सर्व प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
सन्माननीय कुलगुरू महोदय म्हणाले, मी प्रथमतः या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहोत आणि एवढी मोठी विद्यार्थी संख्या बघून मला खरोखर या संस्थेचा अभिमान आहे. शून्यातून सुरू झालेलं हे महाविद्यालय मोठ्या प्रमाणावर सर्व सुख सुविधा देऊन चालू आहे आणि या महाविद्यालयामध्ये रेगुलर नियमित वर्ग होतात हे खरोखर प्रशंसनीय आहे.

मा. प्र कुलगुरू सरवदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले या महाविद्यालयाचे संचालक सुनील मगरे हे फार मेहनती आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे प्राचार्य हे सुद्धा अनुभवी आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाची प्रगती होत आहे .
शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे म्हणाले आमच्या महाविद्यालयामध्ये संस्थेच्या अध्यक्ष यांनी सर्व प्रकारच्या सुविधा देऊन महाविद्यालयाला पुढे नेण्याचे कार्य केले आहे. आज महाविद्यालयांमध्ये सर्व प्राध्यापक नेट, सेट आणि पीएचडी झालेले आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये नियमित वर्ग होत असतात. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अहोरात्र परिश्रम करून महाविद्यालयाला C++ हा दर्जा प्राप्त करून दिला त्याबद्दल मी सर्व प्राध्यापकांचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आणि सन्माननीय कुलगुरू महोदयांनी संपूर्ण मराठवाडा फिरून परीक्षा विभागाला वैभव प्राप्त करून दिले त्याचप्रमाणे हजारो विद्यार्थी सेट आणि नेट व पीएचडी झालेले नोकरी पासून वंचित होते अशा शिक्षकांना विद्यार्थ्यांना संपूर्ण मराठवाडा मधील संस्थांना अनिवार्य करून तज्ञ आणि पीएचडी झालेल्या शिक्षकांना नोकऱ्या मिळून दिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि विविध संस्थांचा दर्जा यामुळे वाढलेला आहे. आणि सर्व संस्थांमध्ये रेगुलर क्लासेस सुरू झालेले आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिमानाची बाब आहे.
या कार्यक्रमाचे संचलन डॉ. पूजा गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शीलवंत गोपनारायण यांनी केले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!