March 12, 2026

संभाजीनगर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रेखा प्रकाश चव्हाण यांचा सत्कार

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

दिनांक : 07 मार्च 2026

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : अशोक अधाने

छत्रपती संभाजीनगर : आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी तापडिया नाट्यमंदिर येथे दिव्य मराठी तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रेखा प्रकाश चव्हाण व प्रकाश नामदेव चव्हाण यांचा शॉल व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून संजय शिरसाट (जिल्ह्याचे पालकमंत्री), संदिपान भुमरे (संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार) तसेच संतोष दानवे (भोकरदन तालुक्याचे आमदार) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सत्कार पार पडला.

या वेळी विविध मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.