March 12, 2026

प्रमाणपत्र पदवीधर नव्हे तर गुणवत्ता प्रमाणपत्र पदवीधर व्हा – डॉ. गव्हाणे

www.themaharashtratoday.com

प्रतिनिधी : अशोक अधाने

छत्रपती संभाजी नगर: दिनांक ०९ सप्टेंबर २०२५

मिटमिटा | “आजकाल अनेक विद्यार्थी केवळ प्रमाणपत्रासाठी पदवी घेतात, परंतु काम करण्यासाठी प्रमाणपत्र नव्हे तर तुमची गुणवत्ता कामी येते. म्हणूनच प्रमाणपत्र पदवीधर होण्यापेक्षा गुणवत्ता प्रमाणपत्र पदवीधर होण्याचा प्रयत्न करा,” असे प्रतिपादन नामवंत विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

सिद्धार्थ कॉलेज, मिटमिटा येथे पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, “सध्याच्या पत्रकारितेमध्ये संधींची कमतरता नाही. आपली पत्रकारिता मांडण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत. जर तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता.”

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील मगरे आणि प्राचार्य डॉ. मनोहर वानखेडे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला पत्रकारिता व जनसंवाद विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.