गदाना : 2 ऑगस्ट 2024
प्रतिनिधी : अशोक अधाने
www.themaharashtratoday.com
जिल्हा परिषद शाळा गदाना येथे शालेय समितीच्या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडीत अर्चना अशोक आधाने यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी संजय दिगंबर चव्हाण यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमाला गावातील प्रमुख व मान्यवरांची उपस्थिती होती.
शालेय समितीच्या निवडीमध्ये सदस्य म्हणून अर्चना जगताप, स्वाती वरदे, कोमल वाघ, नवनाथ कुकलारे, वंदना पंडित, सुनिता अधाने, साहेबराव चव्हाण, बाशीद पटेल, निलेश बिरसने, कचरू वाघ, ज्ञानेश्वर कुकलारे (शिक्षण प्रेमी), व पंढरी तायडे सर (शिक्षक प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेदरम्यान, उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध उपक्रमांवर चर्चा केली. शालेय समितीच्या नव्या कार्यकारी मंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी शालेय समिती सदस्य, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये पोपट चव्हाण, कैलास बडूगे, राजू चव्हाण, काकासाहेब अधाने, वैजनाथ अधाणे, मधुकर खाडे, कचरू वाघ, नवनाथ कुकलारे, निलेश बिरसने, योगेश पंडित, ज्ञानेश्वर कुकलारे, लाला खाडे, गणेश चव्हाण, राजू बिरसने, अशोक अधाने यांचा समावेश होता.
शालेय समितीच्या निवड प्रक्रियेनंतर उपस्थितांनी विविध शालेय उपक्रमांच्या आयोजनावर चर्चा सत्रांवर भर दिला. नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपले कार्य तत्परतेने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शाळेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
निवड समितीने सर्व उपस्थितांचे आभार मानले व शाळेच्या विकासासाठी त्यांचे सहकार्य कायम राखण्याचे आवाहन केले.
More Stories
संभाजीनगर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रेखा प्रकाश चव्हाण यांचा सत्कार
वेरुळ येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांच्या समस्यांचा जागीच निपटारा
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर