www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 24 फेब्रुवारी 2026
गदाना | प्रतिनिधी : अशोक अधाने
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) केंद्रास आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आज इयत्ता १२ वीचा अर्थशास्त्र या विषयाचा पेपर होता.
सिडको येथील पद्मश्री वसंतदादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, चिकलठाणा या दोन परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी परीक्षा संचालनाची संपूर्ण प्रक्रिया, परीक्षा दालनातील शिस्त, आसनव्यवस्था, गोपनीयता आणि पारदर्शकता यांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रांवर कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा, त्याची स्टोरेज व्यवस्था तसेच नियंत्रण प्रणालीची तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना पुरेसा उजेड, हवा व पिण्याचे पाणी याची व्यवस्था उपलब्धता याबाबत पाहणी केली. उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी असलेले शांतता व एकाग्रतेचे वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
More Stories
संभाजीनगर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रेखा प्रकाश चव्हाण यांचा सत्कार
वेरुळ येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांच्या समस्यांचा जागीच निपटारा
ग्रुप ग्रामपंचायत गदाना-बोरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती साजरी