March 15, 2026

ग्रुप ग्रामपंचायत गदाना-बोरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती साजरी

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

दिनांक : 19 फेब्रुवारी 2026

गदाना | प्रतिनिधी : अशोक अधाने

 

दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रुप ग्रामपंचायत गदाना-बोरवाडी कार्यालयामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती औपचारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडला. कोणतेही भाषण किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. गावातील ज्येष्ठ नागरिक त्रंबक जाधव व भीमराव वाहून यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक अधिकारी गंगाधर गायकवाड, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रेखा प्रकाश चव्हाण, प्रकाश चव्हाण, सरपंच विठाबाई रामहरी तुपे, उपसरपंच सविता दत्तू चव्हाण तसेच रामहरी तुपे, पोपट चव्हाण, वैजनाथ अधाने, सोमीनाथ जाधव, शंकर अधाने, रावसाहेब चौधरी, बंडू वाघ, अरुण बडुगे, हरी चव्हाण, रवी चौधरी, आजिनाथ तुपे, कारभारी भालेराव व गावातील नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.