प्रतिनिधी | अशोक अधाने
www.themaharashtratoday.com
सुलतानपूर दिं. १४ (प्रतिनिधी): गंगापूर-खुलताबाद मतदार संघातील आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे खुलताबाद तालुक्यांतील सुलतानपूर येथील हरियाली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश शुक्ला यांनी शुक्रवारी (दिं १४) पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. सतीश शुक्ला हे सध्या ठाकरे गटातील शिवसेनेच्या नेतेपदी कार्यरत आहे, प्रथम पक्षाकडे प्रामुख्याने उमेद्वारी मागणार आहे, पक्षाने उमेद्वारी दिली तर शिवसेना पक्षातून निवडणूक लढवणार आहे आणि पक्षाने उमेद्वारी नाकारली तर अपक्ष स्वबळावर निवडणूक लढवार असल्याचे त्यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले.
दरम्यान सतीश शुक्ला यांच्या या निर्णयामुळे गंगापूर खुलताबाद विधानसभेतील राजकीय क्षेत्रात मोठे खळबळ तयार झाली आहे.
सतीश शुक्ला हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील पुढे कैवारी म्हणूनही ओळखले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे एक सच्चा मित्र म्हणूनही त्यांची ओळख आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य तासिकेच्या माध्यमातून शुक्ला यांनी घडवून आणले आहे. कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबाना त्यांनी आधार दिला आहे तर अनेक तरुणांच्या हातांना काम देऊन त्यांचा रोजगार निर्माण केला आहे. याप्रमाणे अनेक सामाजिक कार्य शुक्ला यांनी केले असून या कामाच्या जोरावर त्यांनी विधानसभेचे निवडणुकीत उडी घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, त्यांच्या समस्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, तरुण रोजगार निर्मितीसाठी, ग्राम स्वच्छता या विविध विकास कामाचा अजेंडा घेऊन ते निवडणूक लढवणार असल्याचे सतीश शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
www.themaharashtratoday.com
जाहिरात, बातम्या आणि लाईव्ह व्हिडीओसाठी संपर्क ९६२३८७१९८७
More Stories
संभाजीनगर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रेखा प्रकाश चव्हाण यांचा सत्कार
वेरुळ येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांच्या समस्यांचा जागीच निपटारा
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर