✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987
www.themaharashtratoday.com
वेरूळ : 19 फेब्रुवारी 2025 – छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव जगभरात अनेक ठिकाणी संपन्न होत असतो, परंतु ज्या भूमीत स्वराज्याचे स्पुलिंग पेटले गेले,अशी मालोजीराजे भोसले गढी श्रीक्षेत्र वेरूळ येथे प्रथमच जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव अनेक मान्यवरांच्या आणि शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला, याप्रसंगी बाबाजींच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये शिवछत्रपतींचे शिव विचार शिवभक्तांच्या समोर मांडले, शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे राजेंद्र पवार यांनी प्रस्ताविक आणि आभार प्रदर्शन व्यक्त करताना मोलाचे विचार मांडले राजेंद्र पवार यांनीपुढे बोलताना म्हटले की मी कायम म्हणत असतो आपला जन्म शिवछत्रपतींच्या काळात मावळा म्हणून व्हायला पाहिजे होता किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तरी आपला कार्यकाळ असायला पाहिजे होता आपल्याला शिवप्रभूंचा आणि क्रांतिकारकांचा सहवास लाभला असता परंतु जन्म मृत्यू काही आपल्या हातात नसतो, परंतु आपल्या नशिबात छत्रपती शिवराय आणि क्रांतिकारक यांच्या विचारांची सेवा करण्याची संधी आता आपल्यालाआलेली आहे, म्हणूनच मी गेल्या आठ वर्षापासून गाव तथा संपूर्ण जिल्हा एकत्र करून18 मार्चला स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची जयंती पुढाकार घेऊन साजरी करत आहे आणि आता महाराष्ट्रभरातून या जयंतीला शिवभक्त हजेरी लावतात, तद्वतच कर्नाटक राज्यातील होदेगिरी येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांची मूळ समाधी आहे तीही दुर्लक्षित आहे, म्हणूनच गेल्या चार वर्षापासून मी तेथे काम करण्याच ठरवले, दरवर्षी 23 जानेवारी शहाजी महाराज पुण्यतिथीला कर्नाटक राज्यात होदेगिरी येथे जाऊन महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो, भोसले घराण्यातील प्रत्येक सदस्याने राष्ट्र आणि समाज उन्नतीसाठी रक्षणासाठी कार्य केलेले आहे, परंतु त्यांच्या कुटुंबातील महापुरुषांच्या सामाध्या अनेक ठिकाणी दुर्लक्षित आहे, तेथेही काम होणे गरजेचे आहे, बाबाजींच्या कृपेने मी शहाजी महाराज समाधी होदेगीरी सहित जेथे जेथे शिवप्रभूंच्या परिवारातील सदस्यांच्या पाऊलखुणा आहे तेथे सेवाकार्य करण्याचा संकल्प मी घेतलेला आहे आणि यासाठी बाबाजी आणि शिवप्रभू मला बळ देतील हा माझा विश्वास आहे , याप्रसंगी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की वेरूळ येथील शहाजीराजे महाराज स्मारक विकासासाठी जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करीन आणि आत्ताच प्रयागराज येथे कुंभमेळ्यामध्ये जगतगुरु पदवी स्वामी शांतिगिरी महाराजांना मिळाली त्यांचाही विशेष सत्कार शहरात आम्ही ठेवणार आहोत, त्याचे कारण असे की निर्वेसनी समाज घडवणे आणि क्रियाशील सेवक तयार करणे हे सुद्धा राष्ट्रीय कार्यच आहे,यासाठी उत्तराधिकारी म्हणून शांतिगिरीजी महाराजांचे कार्य मोठे आहे अशा भावना त्यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये व्यक्त केल्या. जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी शिवकार्यावर प्रवचन देत असताना भक्तांना उपदेश केला की छत्रपती शिवराय यांचे कार्य महान आहे, त्यांना घडवण्यासाठी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज मासाहेब जिजाऊ यांनी विचाराची शिदोरी शिवप्रभुंना दिली त्यांच्याच म्हणजेच भोसले घराण्याच्या विचारातून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची सेवा करणारे मावळे घडवले स्वराज्याच्या निर्मितीमध्ये प्रत्येक महत्त्वाच्या लढाईमध्ये स्वतः शिवछत्रपतींनी सहभाग घेतला जीवाची परवा न करता रयतेच्या कल्याणासाठी अनेक जोखमी त्यांचाच वारसा पुढे छत्रपती संभाजी राजांनी चालवला स्वराज्यासाठी बलिदान देणारे जगातील महान व्यक्ती म्हणजेचछत्रपती संभाजी राजेसेवाभाव आणि पराक्रम याचा वारसा भोसले घराण्याने आपल्याला दिलेला आहे त्यांचेच वंशज आपणही प्रत्येक जण आहोत म्हणूनच आज मालोजीराजे भोसले गढीवर आपण शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत आणि हा सोहळा प्रत्येक वर्षीमोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत मालोजीराजे गडी वरील शिवजन्मोत्सव सोहळा येणाऱ्या काळात भव्यदिव्य होईल असा विश्वास आम्हाला आहे कारण राजूभाऊ पवार सारखे बाबाजींच्या कार्यातील अनेक मावळे छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित आहेत असे मत जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केले मिरवणुकी सहित सांस्कृतिक कार्यक्रमातने शिवजन्मोत्सव संपन्न झाला त्यानंतर जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आश्रमात शिवभक्तांना महाप्रसादवाटप करण्यात आला याप्रसंगी जय बाबाजी भक्त परिवारातील पदाधिकारी तथा माता भगिनी आणि शिवभक्त उपस्थित होते याप्रसंगी राजेंद्र पवार यांनी उपस्थित असलेल्या शिवभक्तांना आवाहन केले की 18 मार्च रोजी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती आहे त्याही वेळेस आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहुल शिवकार्याची सेवा करावी असे आवाहन केले
More Stories
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्याची मतमोजणी प्रक्रिया व तयारी बाबत.
📰 ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश