June 15, 2026

सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव येथे ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा

www.themaharashtratoday.com

प्रतिनिधी : अशोक अधाने

छत्रपती संभाजी नगर: दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जाणारा राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे हे अध्यक्षस्थानी होते तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शीलवंत गोपनारायण यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वानखडे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. सियाली रामामृत रंगनाथन यांनी गणितज्ञ व गणित विषयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना सुद्धा ग्रंथालय या विषयाला योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपले पद सोडून देऊन ग्रंथालय जगतात नवीन दिशा, कायदे, सुव्यवस्था निर्माण व्हावी, ग्रंथालयामध्ये पुस्तकांची देवाण-घेवाण करण्यासाठी वर्गीकरण व तालिकीकरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी पूर्ण वेळ देऊन ग्रंथालयाचे कामकाज सोपे करण्यासाठी कार्य केले, त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आणि त्यांना डॉक्टररेट ही पदवी बहाल करण्यात आली.अशा या महान ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूतीस त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुढे ते म्हणाले ग्रंथालय या विषयाकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाच्या शासन व प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचे सुद्धा प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे म्हणाले. ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल आणि ग्रंथालय सेवक यांच्याकरिता राज्य शासनाने योग्य ते वेतन श्रेणी देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांना व वाचनालयांना शासनाने अनुदान देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिलवंत गोपनारायण, डॉ. सुकेशनी जाधव, ग्रंथपाल प्रा .सुनील बत्तिसे, प्रा. असित शेगावकर, प्रा. दीपक पाईकराव, अनिता काकरवाल , मोईन तडवी, रोहिणी देवकते, प्रा.रेणुका चव्हाण, कोमल गायकवाड, परमेश्वर रत्नपारखे, श्रीकांत पातोडे, विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You may have missed