December 6, 2025

सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व आनंदनगरी संपन्न

वार्ताहर – अशोक अधाने

मो. ९६२३८७१९८७

www.themaharashtratoday.com

खुलताबाद : दि.११ फेब्रुवारी २०२५
गल्ले बोरगाव येथील सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद नगरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी संस्थापक अरुण पाटे यांच्या मार्गदर्शना खाली या आनंदनगरी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण टीव्ही चॅनल वरील मालिका तारक मेहता, सीआयडी फेम प्रसिद्ध अभिनेते नंदू भुरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती, तर सहायक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे, सरपंच विशाल खोसरे, भद्रा मारुती संस्थानाचे सदस्य बाबासाहेब बारगळ, रामदास पाटे ,आबासाहेब बारगळ, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बढे, पत्रकार अण्णा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम भद्रा मारुती संस्थानाचे सदस्य बाबासाहेब बारगळ, सरपंच विशाल खोसरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे प्रतिमा पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले व तदनंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटे, व संचालिका अश्विनी पाटे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तदनंतर पाहुण्यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या बाल गोपाल चिमुकल्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवित मन जिंकली, या मध्ये वारकरी नृत्य, आदिवासी नृत्य, गवळण, मंगळागौर, कोळी नृत्य, धनगर नृत्य, शेतकरी नृत्य, सादर करण्यात आले होते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यासह सर्व पालक, विद्यार्थ्यांनी आनंदनगरीचा आनंद घेतला .
या वेळी मुख्याध्यापक सागर देवरे, उपमुख्याध्यापक श्रीमती भारती धुरी, उपसहाय्यक मीरा वगावाड, मनीषा गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना हारदे, जाधव मिस, संगीता बारगळ, बागेश्वरी मिस, पायल नागे, सोनम भावंडे, कोमल हरक, बागेश्वरी बारगळ, अर्चना कुमावत, धनश्री लेकुरवाळे, रोहिणी नलावडे, कांचन खोसरे, शोभा खिल्लारे, पवन वाघ, मनोज बोडके, ऋषिकेश इंगळे किरण जामकर, कृष्णा, उमा गायकवाड, ठेंगडे, दुधारे, यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
तर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.