December 6, 2025

समाजसेवक सुमित पंडित यांना संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी | अशोक अधाने

www.themaharashtratoday.com

छत्रपती संभाजीनगर दि.१५ जून २०२४ (प्रतिनिधी) :  समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरचं समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णांची दाढी केस कापून स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात कागदोपत्री पुर्तता करुन उपचारासाठी दाखल करतात, शासकीय रुग्णालयात गरजु रुग्णांना अर्ध्या रात्री मेडिकल साहित्य,भोजन,रक्त,पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावुन जाते,बेवारसांचे अत्यंविधी सुध्दा हे दापत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात, सुमित यांची पत्नी पुजा पंडीत सध्या संभाजीनगर (औरंगाबाद) येथे रोडवरील बेवारस अवस्थेत सापडलेल्या वृध्दाचा वृध्दाश्रमात सांभाळ करते, जटवाडा रोड येथे माणुसकी वृध्द सेवालय देखील वृध्दाच्या सेवेसाठी मदतकार्य करते, म्हणूनच त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेत,त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, सर्व मान्मानिय सत्कार मुर्ती ना कळवण्यात आनंद होत आहे.सुपर महाराष्ट्र न्युज अँड एंटरटेनमेंट चॅनल यांच्या अष्ट वर्षापूर्ती निमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.हा सोहळा मासिया हाल मोरे चौक एम.आय.डी.सी.वाळुज छ.संभाजीनग येथे दिनांक १५-६-२०२४ रोजी आयोजीत करण्यात आला आहे,या कार्यक्रमाचे आयोजक डि.पी.वाघ संपादक यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे निवड समितीतर्फे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.या आधी सुमित पंडित यांना विविध ९९ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांचा हा १०० वा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ह्या पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक सुमित पंडीत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना हा १०० वा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी तो पुरस्कार माणुसकी समुहाला अर्पण केली आहे.