रिपोर्टर : अशोक अधाने
संपर्क: 9623871987
दि.०४ फेब्रुवारी २०२५
www.themaharashtratoday.com
म्हैसमाळ येथील श्रद्धास्थान व मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या श्री गिरजा माता यात्रा महोत्सव 2025 निमित्त भाविकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा भव्य सोहळा संपन्न होणार असून, सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून माता गिरजाईच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गिरजा देवी संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
यात्रा महोत्सव विशेष कार्यक्रम:
▶ 8 फेब्रुवारी 2025 (शनिवार) – रात्री 9:00 वाजता श्री मारुती मंदिरासमोर काठी स्थापना
▶ 12 फेब्रुवारी 2025 (बुधवार) – सकाळी 5:00 वाजता महापूजा व अलंकार चढविणे
▶ 12 फेब्रुवारी 2025 (बुधवार) – रात्री 12:00 वाजता काठी मिरवणूक
▶ 15 फेब्रुवारी 2025 (शनिवार) – सकाळी 8:00 वाजता महा अभिषेक व यात्रा सांगता
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र उत्सवाचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस