✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987
www.themaharashtratoday.com
गदाना (वार्ताहर) – खुलताबाद तालुक्यातील सराई येथील कै. गोरख (अण्णा) भागन पा. नागे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद् भागवत कथा सत्संग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय सोहळा 1 मार्च 2025 ते 7 मार्च 2025 या कालावधीत संपन्न होणार असून, यामध्ये भागवत कथासेवन, कीर्तन व ग्रंथ शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे तपशील:
📌 श्रीमद् भागवत कथा
दिनांक: 1 मार्च 2025 (शनिवार) ते 7 मार्च 2025 (शुक्रवार)
वेळ: रात्री 8 ते 10
कथाकार: भागवत चंद्रिका सुश्री सौ. राजेश्वरी दीदी
स्थळ: श्री हनुमान मंदिर, सराई, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
📌 ग्रंथ शोभायात्रा
दिनांक: 7 मार्च 2025
वेळ: सायंकाळी 5 ते 6
📌 पुण्यस्मरण कीर्तन
ह. भ. प. कल्याण महाराज भुजंग यांचे कीर्तन
दिनांक: 8 मार्च 2025
वेळ: सकाळी 9 ते 11
या भक्तिसोहळ्यात सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
आयोजक व विनम्र निवेदक:
श्री दीपक गोरख नागे, श्री राहुल गोरख नागे,
सौ. रूपाली संदीप भिंगारे (बहीण) व समस्त नागे परिवार,
सराई, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
More Stories
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!
श्रावण महिन्यात भेंडाळा मारुती मंदिरात प्रत्येक शनिवारी कीर्तन महोत्सव
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.