प्रतिनिधी : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
खुलताबाद : दिनांक: 28 जुलै 2025
खुलताबाद – येत्या २८ जुलै २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी व सोमवारी हजारो भाविक खुलताबाद येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी, वाहतूक कोंडी व अनुशासन राखण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
दर शनिवारी रात्री ८.०० वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ६.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे वाहतूक मार्ग बदल करण्यात येणार आहे.
सर्व वाहन चालक व भाविकांनी बदललेल्या मार्गाचे पालन करावे. गर्दी, अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे. आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भाविकांची सुरक्षितता हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय राहील.
– डॉ. विनायककुमार राठोड
पोलीस अधीक्षक, छ.सं.नगर ग्रामीण
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस