July 9, 2025

शेती वाचवा, शेतकरी वाचवा – महाराष्ट्र वाचवा” – समाजसेवक पांडुरंग जाधव यांचे स्पष्ट प्रतिपादन

 

www.themaharastratoday.com

खुलताबाद | दि. ०२ जुलै २०२५ | प्रतिनिधी : – अशोक अधाने

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समाजसेवक पांडुरंग जाधव यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, अडचणींवर आणि त्यांच्या सशक्तीकरणावर स्पष्ट व ठोस विचार मांडले.

पांडुरंग जाधव म्हणाले, “शेती टिकली तर देश टिकेल, आणि शेतकरी राजा उभा राहिला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.”
त्यांनी शेतीला देशाचा खरा आत्मा म्हणत, आजही शेतकऱ्याला मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. “वेळेवर वीज आणि पाणी न मिळाल्याने शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे,” असे ते म्हणाले.

महाराष्ट्र कृषी दिन निमित्ताने  – समाजसेवक पांडुरंग जाधव : “शेती वाचवणे हेच पहिले कर्तव्य”

🔸 दिवसा वीज उपलब्ध झाल्यास रात्री पाण्यासाठी शेतात जावे लागणार नाही, परिणामी अपघात आणि वन्य प्राण्यांचा धोका टळेल, असे त्यांनी नमूद केले.

🔸 शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. “जसे सरकार कारखानदारांना सुविधा देते, तशाच सुविधा शेतकऱ्यांनाही मिळाल्या पाहिजेत. शेतापर्यंत रस्ते, पाण्याची सोय, दिवसा वीज, बाजारपेठ आणि योग्य हमीभाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

🔸 त्यांनी सरकारवरही टीका करत म्हटले, “प्रत्येक सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले. प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न आजही तसंच आहेत. शेती संकटात गेली, तर देशही संकटात जाईल. त्यामुळे शेती वाचवणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे.”

त्यांच्या सामाजिक कार्याला  शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने एकमुखी पाठिंबा दर्शवित आहे.