www.themaharastratoday.com
छ.संभाजीनगर | दि. ०५ जुलै २०२५ | प्रतिनिधी : – अशोक अधाने
इंजिनिअर सौरव मगरे आणि इंजिनिअर साहिल मगरे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने मिटमिटा भागातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे होते. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरणातील झपाट्याने होत असलेल्या बदलांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “जगभरातील तापमानवाढ, औद्योगिकीकरण आणि वाढते प्रदूषण हे मानवी जीवनासाठी धोकादायक बनत चालले आहे. अशा परिस्थितीत प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्षारोपण हा सर्वोत्तम पर्याय आहे.”
या उपक्रमाद्वारे सौरव मगरे आणि साहिल मगरे यांचा वाढदिवस सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर संचलन श्री. आसित शेगावकर यांनी केले, तर दीपक पाईकराव यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
More Stories
गदाना व भडजी गावच्या गुणवंत विद्यार्थिनींचे सी.ए. परीक्षेत घवघविता यश – ग्रामपंचायतीकडून भव्य सत्कार सोहळा
🔷 सत्ता बदलण्याची संधी; खुलताबाद तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत जाहीर 🔷
न्यू हायस्कूल गदाना येथे अबळाजी वाहुळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न