December 6, 2025

विद्यालंकार प्री-प्रायमरी स्कूल बोरवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

बोरवाडी : 19 फेब्रुवारी 2025 – विद्यालंकार प्री-प्रायमरी स्कूल, बोरवाडी येथील आज मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन काटशेवरी फाटा येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आनंद व्यक्त केला.

या वेळी शाळेतील कीर्ती जोरे, आरती रानडे, विशाल गवळे, समीर पटेल, रवींद्र गोल्हार, सुनिता राऊत, कविता लोहार, प्रतीक्षा जाधव, गायत्री जाधव यांसारख्या शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना शिवचरित्राचे महत्त्व सांगितले. तसेच, काटशेवरी फाटा व परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

या कार्यक्रमात छत्रपतीशिवाजी महाराजांची वेशभूषा शिवराज हिवर्डे यांनी केली तर भाषण कीर्ती हिवर्डे, तेजल जाधव, प्रीती हिवर्डे, कुणाल वाकळे, भावेश मातकर, स्वराज हिवर्डे या  विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र, गड-किल्ले आणि स्वराज्य स्थापनेवरील भाषणे, गीते आणि नृत्य सादर करून शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले. परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

  • द महाराष्ट्र टुडे न्यूज

www.themaharashtratoday.com