गदाना
दि. ११ मे २०२४
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास हा खूप मागे राहिलेला आहे तो स्थानिक राजकारण्यांनी तो थांबवून ठेवलेला आहे. जिल्यात विकास करण्यासाठी पाणी,वीज,शिक्षण,आरोग्य,शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा, शेतकऱ्यांना वाजवी दरात बियाणे-खते-फवारणी यंत्र व शेतीपूरक यंत्रसामुग्री, मोफत स्पर्धापरीक्षा केंद्र, वृद्धांसाठी प्रत्तेक गावात निवारा केंद्र, महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र, कचरा व्यवस्थापन असे बरेच कामे येथील राजकारणी लोकांना दिसत नाही तर फक्त जातीयवाद करून “हिंदू खतरे में है” करत लोकांची दिशाभूल करत धूळफेक करत आहे.
मागील कार्यकाळामध्ये आपण पहिले असेल कि माझ्याकडे कुठलीही सत्ता नसतांना देखील मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पीकविमा मिळावा म्हणून कार्य केले आहे ते आपण समजून घेणे गरजेचे आहे. मी आमदार असतांना एखादे काम हाती घेतले तर पूर्ण करण्यासाठी माझा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरीही मी मागे हटलो नाही.
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खुलताबाद तालुक्यातील काटशेवरीफाटा येथे नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली यावेळी उपस्थित किरण निकम, सोमीनाथ जाधव, गोळेगाव येथील नंदू चव्हाण, बाळू शेळके,शिवाजी चौधरी,अक्षय साळुंके व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस