www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मो. 9623871987
छत्रपती संभाजीनगर : रमाई प्रतिष्ठान संचलित सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, सानिका बी. डिझाईन महाविद्यालय, सानिका नर्सिंग महाविद्यालय तसेच सानिका डी. फार्मसी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्रा. सुनील मगरे व प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाविषयीच्या विचारांवर प्रकाश टाकला. “स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण समाज शिक्षित होतो आणि देशाच्या विकासाला गती मिळते,” असे ते म्हणाले. महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करत बालविवाहाला विरोध दर्शविला तसेच विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. अंधश्रद्धा, सामाजिक रूढी आणि चुकीच्या धार्मिक समजुतींविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. स्त्री ही समाजाचा पाया आहे, हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संचालक प्रा. सुनील मगरे यांनीही मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील विरोध सहन करत महिलांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य डॉ. शीलवंत गोपनारायण यांनी केले, तर प्रास्ताविक प्राचार्य नीलम साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमास कल्पना कनकुटे, प्रा. गीतांजली कुबेर, प्रा. आकाश घुले, प्रा. निखिल साळवे, प्रा. कोमल मॅडम, प्रा. योगिता शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन