November 16, 2025

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या कार्यकाळाच्या वाढीसाठी विधानसभेत मुद्दा मांडणार – आ. प्रशांत बंब

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

लासूर स्टे : 19 फेब्रुवारी 2025 –

खुलताबाद व लासूर स्टेशन येथील प्रशिक्षणार्थ्यांनी दिले लेखी निवेदन

महाराष्ट्र शासनाने विविध विभागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक तालुके व जिल्ह्यांमधील प्रशिक्षणार्थी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन देत कार्यकाळ वाढवण्याची मागणी करत आहेत.

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना वेरूळ येथील शिक्षक आणि लासूर स्टेशन येथील आरोग्य विभागातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथे लेखी निवेदन सादर केले.

यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढवण्याचा मुद्दा मी विधानसभेत मांडणार असून, त्याचा कार्यकाळ नक्की वाढवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन दिले.

यावेळी उपस्तीत प्रशिक्षणार्थ्यांची – अमोल गायकवाड, सुनील खंडागळे, भाग्यश्री गवळी, इमरान शेख, प्रियंका जाधव, स्वप्निल सोनवणे, सोनाली गवळी, पल्लवी ठेंगडे, कविता काळे, प्रियंका बोरुडे, सोनाली जाधव, योगेश नरोडे, शरद पगारे, अजय गायकवाड.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या कार्यकाळात वाढ झाल्यास अनेक तरुणांना याचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.